म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करताना…

गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्व खर्चांचे नियोजन करून शिल्लक राहणारी रक्कम म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या विषयी…

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी कशाची गरज भासते?

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला केवायसी अर्थात ‘नो युअर कस्टमर’ ही प्रक्रिया पार पाडावी लागते. ऑनलाइन अथवा ऑफलाइन माध्यमातूनही ही प्रक्रिया
पूर्ण करता येते. गुंतवणूकदाराने विहीत अर्ज भरून, सोबत फोटो जोडावा. तसेच, पॅन कार्डचे झेरॉक्स या ​शिवाय आधार कार्ड, पासपोर्ट, वीजबिल किंवा बँकेचे स्टेटमेंट या पैकी एक पुरावा सोबत जोडावा. या कागदपत्रांसमवेत प्रथमच गुंतवणूक करत असल्याचा अर्ज ब्रोकरकडे किंवा म्युच्युअल फंडाच्या कार्यालयात सादर करावा. काही म्युच्युअल फंड कंपन्या वेबसाइट किंवा वितरकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करतात. •म्युच्युअल फंड योजना कशी निवडावी?

प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी आपापल्या गरजांप्रमाणे किंवा निर्धारित उद्दिष्टांप्रमाणे फंडांची निवड करावी. त्यासाठी आर्थिक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आज बाजारात अनेक वेबसाइट्सच्या
मदतीने आर्थिक नियोजन करता येते. वित्तीय सल्लागार तसेच, म्युच्युअल कंपन्यांच्या वितरकांची मदतही त्यासाठी घेता येते. तसेच, गुंतवणूकदाराच्या वयाप्रमाणेही कोणत्या फंडात किती गुंतवणूक करावी, याचा ढोबळ आराखडा तयार करता येता. त्याप्रमाणे इक्विटी, डेट आणि बॅलन्स्ड आदी पर्यायांचा विचार करावा. म्युच्युअल फंडांमध्ये अगदी एका दिवसासाठीही गुंतवणूक करता येते. एक दिवस ते तीन वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर डेट अथवा
आरबिट्राज फंडात गुंतवणे कधीही उत्तम. तीन ते पाच वर्षांच्या गुंतवणुकीसाठी हायब्रिड किंवा बॅलन्स फंडांत
चांगले ठरतात. दीर्घकालीन अर्थात किमान पाच ते सात वर्षांच्या गुंतवणुकीसाठी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी. •कंपन्यांची निवड कशी करावी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *