एकतर्फी प्रेम करणाऱ्यांसाठी खास टिप्स!

प्रेम हे जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे, असं कायम म्हटलं जातं. शिवाय, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असलीच पाहिजे, असेही नाही. प्रेमाला एकतर्फी वगैरेची बंधनं नसतात. मात्र, तरीही एकतर्फी प्रेमातील काही लोक मर्यादा ओलांडतात. अशा लोकांसाठीच आम्ही काही खास टिप्स देणार आहोत. टिप्स म्हणण्यापेक्षा सजेशन्स म्हणूया. कदाचिय या सजेशन्समुळे तुमचं एकतर्फी प्रेम तिला किंवा त्याला कळूही शकतं.


प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते, असं कायम म्हटलं जातं. त्यामुळे प्रपोज करण्याआधी मैत्री करा. जेणेकरुन मैत्रीचं समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्यानंतर तुमच्या मनातलं तिच्यासमोर व्यक्त होऊ शकता.


तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, त्या व्यक्तीची आवड-निवड जाणण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होईल की, तुम्ही समोरच्या व्यक्तीला आवडणाऱ्या गोष्टींबाबत बोलू शकता आणि तिला तुमच्याकडे आकर्षित करु शकता.


मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत आहे किंव त्या व्यक्तीलाही तुम्ही आवडू लागला आहात, असे लक्षात आल्यावर थेट तुमच्या फिलिंग्ज तिला सांगून टाका. व्यक्त झाल्याने मनावरील दडपण आणि ताणही कमी होतो. शिवाय, तुमचं म्हणणंही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. तिचा होकार की नकार, हा पुढचा मुद्दा.


एवढं सारं करुनही तुम्हाला तुमचं प्रेम मिळत नसेल, तर हिंसक न होता शांतपणे एक पाऊल मागे घ्या. आयुष्य तुम्हाला नक्की पुढची संधी देईल. किंवा असंही असू शकतं की, हे प्रेम मिळालं नाही, म्हणजे कुठंतरी कुणीतरी तुमच्यासाठी खास व्यक्ती आहे, जी तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *