समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु असल्याचे काही पुरावे

समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु असल्याचे काही पुरावे


समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु असल्याचे काही पुरावे
१) महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांच्या पदरी तारो गोपाळ नावाचा कारकून होता. त्याला आज्ञा करून राजेंनी समर्थांच्या अनेक ग्रंथांच्या प्रती शके १५९६ ते १६०६ या दरम्यान तयार करून घेतल्या (या प्रती आजही तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात आहेत) त्यापैकी दासबोधाची प्रत कल्याण स्वामी यांचे लहान बंधू दत्तात्रेय स्वामी यांनी लिहिलेल्या व ग्वाल्हेर येथील प्रतींशी तंतोतंत जुळते.

२) भोसले घराण्याचे सध्याचे जे वंशज तंजावर येथे राहतात त्यांच्या नित्यपुजेत दासबोध हा ग्रंथ असून तो सोनेरी शाईने लिहिलेला आहे.

३) शिवरायांच्या वंशजांपैकी नागपूरचे वंशज हे देखील समर्थ भक्त आहेत आणि त्यांच्या देवघरात समर्थ रामदासांची पंचधातूंची मूर्ती पहावयास मिळते.

४) सातारा गादीचे वंशज देखील दर वर्षी न चुकता गुरुगादी म्हणून सज्जनगडावरील समर्थ मठास भेट देतात व समर्थांपुढे नतमस्तक होतात.

५) ज्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील सर्व गड-कोट पडण्यास सुरुवात केली…याबाबत त्यांनी तत्कालीन छत्रपती श्री प्रतापसिंह महाराज (छ. शाहू महाराजांचे वडील) यांना कळविले. याचा छत्रपती प्रतापसिंहांच्या उत्तर पेशवाईतील एका रोजनिशीमध्ये उल्लेख असा आहे की “इंग्रजांनी रंगो बापु करवी गड-कोट पाडण्यासंबंधी विचारले असता राजे म्हणाले – …….२ गडांना तसवीस देऊ नये, १ प्रतापगड आमच्या भवानीदेवीचा व १ गड परळी (सज्जनगड) आमच्या गुरूचा ….” (नोंद-यावेळी इंग्रजांनी बहुतांश राज्य गिळंकृत केले होते)
यावरून हेच सिद्ध होते कि छ. प्रतापसिंह महाराज सुद्धा समर्थांना भोसले घराण्याचे गुरु मानत होते.

६) “छत्रपती शिवाजी” या काशिनाथ गोविंद जोगळेकर यांनी हिंदीतून लिहिलेल्या ग्रंथात एक उल्लेख आहे कि शिवाजी महाराज हे संत तुकाराम आणि संत रामदास यांचे भक्त होते. (पान क्र. २- भूमिका)

७) समर्थांनी महाराजांना दिलेला संदेश आहे – “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”.

८) खुद्द छत्रपतींनीच समर्थांना सज्जनगड मुक्कामास देवू केला होता. स्वराज्यासाठी मिळवलेला एखादा किल्ला महाराज असाच कुणालातरी देतील हे होणे शक्यच नाही.

९) शंभू राजांना महाराजांनी आत्मशांतीसाठी सज्जनगडला समर्थ अनुग्रहासाठी पाठवले होते. बाबा याकूत किंवा कोणी अजून एखादे साधुसंत यांच्याकडे नाही. (जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे काही वर्षे अगोदर निधन झाले होते.)

१०) राज्याभिषेकाच्या वेळी समर्थ प्रदीर्घ काळ उत्तर भारतात गेले असल्या कारणाने कल्याणस्वामी राज्याभिषेकाला उपस्थित असल्याची नोंद आहे.

११) दक्षिण दिग्विजय आटोपून महाराज परत आल्यानंतर ते सर्वप्रथम समर्थांची भेट घेण्यास सज्जनगडावर गेले व नंतर प्रतापगडावर भवानी देवीचे दर्शन घेण्यास गेले. याच भेटीत महाराजांना समर्थांनी दासबोधाची एक प्रत दिली.

१२) खुद्द तुकाराम महाराजांनीच छत्रपतींना समर्थांना गुरु करण्याचा उपदेश केला होता. याबाबत त्यांचे उपदेशपर आणि समर्थांचे वर्णन करणारे अभंग प्रसिद्ध आहेत.


१३) शिवरायांवर ज्यांनी ज्यांनी काव्य केले त्यात तुकाराम महाराज आणि समर्थ यांचेच नाव सर्वात पुढे आहे. बाकीचे जे आहेत ते इतिहासकार आहेत.

१४) तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर शिवरायांना धर्मोपदेश करणारे फक्त रामदास स्वामीच असू शकतात कारण इतर कोणी सिद्ध पुरुष त्या काळात अस्तित्वात असल्याची जास्त माहिती नाही. ज्या काही लोकांची माहिती आहे ते बहुतेक सर्वच मुस्लीम आहेत. त्यामुळे महाराज समर्थांना सोडतील आणि मुस्लीम संतांकडून अनुग्रह घेतील हे कसेकाय होवू शकते…???

१५) प्रबोधनकार ठाकरेंनी समर्थांच्या वर जो ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी समर्थांना शिवरायांचे गुरु असे दाखविले आहे.

१६) जोतीराव फुलेंनी महाराजांवर जो पोवाडा केला त्यात सुद्धा त्यांनी समर्थांना शिवरायांचे गुरु असे दाखविले आहे.

१७) स्वराज्य आणि महाराज यांच्यावर कोणतेही संकट आले असता समर्थ त्यांना उपदेशपर पत्र अथवा संदेश अथवा संकटातून तरण्यासाठी, धीर देण्यासाठी एखादे काव्य करून पाठवतात. या गोष्टी फक्त एखादा गुरूच करू शकतो, कोणता बाबा किंवा मौलवी नाही.

आमचे आणखीन लेख वाचण्यासाठी हे पेज लाईक करा👇

One Comment on “समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु असल्याचे काही पुरावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *