‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रपोज करण्याच्या खास 5 टीप्स

‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवस. पण याच व्हॅलेंटाइन डे आधी आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात आणि आज आहे प्रप्रोज डे. आजच्या या खास दिवशी प्रत्येक प्रियकर-प्रेयसी हे आपलं प्रेम एका खास अंदाजात व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत असता. पण अनेकदा आपलं प्रेम व्यक्त कसं करायचं किंवा प्रपोज कसं करायचं हे माहितच नसतं. पण घाबरु नका, या टीप्स नक्की वाचा…

बॅनर बनवून करा प्रपोज: जे आपल्या प्रियकर अथवा प्रेयसीच्या नकाराला घाबरत नाहीत त्यांच्यासाठी हे पर्याय फारच चांगला आहे. यासाठी आपण आपल्या एका मेसेजचा बॅनर तयार करुन अशा ठिकाणी लावा की, तिथं तिची लगेचच नजर पडेल. पण त्यावर तुमचं किंवा तिचं नाव असता कामा नये. अशावेळी अनेकदा तुमच्या कोडवर्डचा वापर करावा.


जसे आहात तसेच राहा:
 कोणत्याही मुलीला प्रप्रोज करण्याआधी आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमचा निरागसपणा हाच अनेकदा आवडू शकतो. त्यामुळं अतिशय प्रेमळपणे प्रपोज करा. त्यामुळे जरा स्वत:च्या मनाचीही कौल घ्या.


कॅण्डल लाइट डिनर: कॅण्डल लाइट डीनरची आयडिया जेवढी जुनी आहे तेवढीच असरदारही आहे. रोमान्सच्या माहौलमध्ये मेणबत्त्यांचा मंद प्रकाश तुमच्या प्रेमामध्ये नवे रंग भरेल. याच प्रेमाच्या रंगात अचानक मेणबत्या विझवून एखाद्या रोमांटिक गाण्यावर अगदी हलक्या आवाजात तिला प्रपोज करा. पाहा काय बहार येईल.

पहिली भेट झाली त्या ठिकाणी घेऊन जा: प्रप्रोज करण्याची ही आयडिया देखील खास आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीला तिथे घेऊन जा जिथे तुम्ही पहिल्यांदा भेटला होतात. त्यानंतर तिला प्रपोज करा. जेणेकरुन तिला तुमच्या प्रपोज करण्याची स्टाइल आणि तुम्ही दोन्ही नक्कीच आवडेल.


सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये करा प्रपोज: तुमच्या प्रेयसीला एखाद्या रोमांटिक सिनेमाला घेऊन जा. इंटरवलच्या वेळेस जेव्हा ती सिनेमातील ते क्षण आठवत असेल त्याचवेळी तिला प्रपोज करा.

गार्डनमध्ये जाऊन करा प्रेमाचा वर्षाव: ही आयडिया तशी जुनीच म्हणा, पण म्हणतात ना जुनं ते सोनं. तुम्ही तुमच्या प्रेयसीला एखाद्या गार्डनमध्ये नेऊन तिथं निवांत क्षणी तिला प्रपोज करा.


चॉकलेटमध्ये लपवून द्या रिंग: प्रपोज करण्याची ही नवी स्टाइल फारच परिणामकारक ठरु शकते. तुम्ही तुमच्या प्रेयसीला चॉकलेट किंवा स्ट्रॉबेरीमध्ये रिंग पॅक करुन गिफ्ट देऊ शकता. त्याच्याच आत एक छानसा मेसेज लिहून तिला प्रपोजही करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *